म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तान्ध झालो आहोत, हे ह्यांच्या लक्षातही येत नसते.
"वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला; तथापि, त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोर्यातत एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखविली जात. पूर्वजांचीही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल; जे लावाल ते फोफावेल, फळेल.
"एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे, वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले; परंतु भाऊ म्हणाले, 'कसली अवस नि कसला शनिवार! जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो.' ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. तिन्हीसांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले.
घरोब्याच्या
चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो, असे तुम्हीच नेहमी म्हणता.' लहान गोविंदा म्हणाला.
"परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले, तर आपण निर्दोष आहोत, असा अहंकारही जडावयाचा.' भिका म्हणाला.
श्याम गंभीर होऊन म्हणाला, 'मनुष्याला स्वत:चे अध:पतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत, हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते.'
नारायण जरा हसत म्हणाला, 'मी निरहंकारी