ते फार आवडते. 'पडला अभिमन्यू मन्यू वीर रणी । चक्रव्यूह रचिला द्रोणांनी । पडला अभिमन्यू । ' म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता, ते शोधावयास जातात; मुखाने 'कृष्ण कृष्ण' असा मंजुळ जप अभिमन्यू करीत असतो, त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल, असे त्यांना वाटले. कसे छान आहे गाणे! आई! म्हण ना, ग!'

आई म्हणाली, 'आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मीही पुष्कळ दिवसांत ऐकले नाही.' आईने आजीस सांगितले.

दूर्वांच्या आजीला गाणी येत असत, म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधींचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले, काही तरी 'पर्ह्या तली पातेरी कोण हुक् करी' अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पीतांबराचे तरी आजी म्हण. असे म्हटले.

आजी म्हणाली. 'श्याम! ऐक तर खरे. त्या चिंधीच्या गाण्यात पीतांबर पैठण्याच आहेत.'


292 of 468

माझ्यावर रागवले नाहीत, काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरूणावर पडलो.

थोडया वेळाने वडील आले व म्हणाले, 'श्याम! ऊठ बाळ. पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे, मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस तर घोडीवर सुध्दा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत व वर छडया मारीत. माराला भिऊन कसे चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही, तो कसला मास्तर? ऊठ. हातपाय धू. तोंड बघ कसे झाले आहे कोकंब्यासारखे लाल. वाढ ग त्याचे पान आधी.'


292 of 773