आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हालवून गाणे म्हणे, भावनामय होऊन गाणे म्हणे, विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे-ध्रुवपद असे होते.

'द्रौपदीसी बंधु शोभे नारायण'

हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप; म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यांतही जणू अभिन्नत्व, अद्वैत आहे, असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही 'कृष्णा' नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर-सुभद्रेवर- प्रेम कमी; परंतु द्रौपदी- ही मानलेली बहीण - हिच्यावर जास्त. असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे.

प्रसंग असा आहे.


293 of 468



मी उठलो. हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले! मारण्याचे आता कमी करतील, असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेच, तर बेताने मारतील, असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला, असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील, असे वाटले. बाजीरावाच्या पळण्याने मराठयांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य, अगदी पूर्ण जरी नाही, तरी वसाहतीचे तरी मिळाले ! आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसताही!


293 of 773