एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकांत म्हणजे सुर, नर, असुर या तिन्ही लोकांत- सात्त्वि राजस व तामस; श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कोठे कोपर्या त सुगंधी फुल फुललेले असले, तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असावयाचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे. कारण ते नि:स्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत.

या वेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, 'देवा! आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, नि:पक्षपाती, असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले,


294 of 468



मी का पळून गेलो होतो, हे तीन जणांना माहीत होते. मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते. तिन्हीसांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली, तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरूणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, 'श्याम!' मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, 'श्याम, बरे नाही का वाटत? अंग दुखते? मी सांगितले,


294 of 773