'नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टी नि काय?' मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे. तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का. ते सांग.'
कृष्ण म्हणाला, 'नारदा? मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील, तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे; परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणून लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही, त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली, त्यांच्या घरात वारा शिरला. त्यांच्या घरात प्रकाश शिरला, जितके दार उघडाल, तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसेच माझे. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वत: निष्क्रिय
तरी ऐकले नाहीस!' असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेविले व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, 'आई! मी तुझे ऐकले नाही. असा पळून गेलो, म्हणून तू रागावलीस होय? मास्तरांनी मारले, म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखादे वेळेस मारीत! म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले, की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस, 'जायचे, तर पायी जा. आहे ताकद?' आई! मी पायी जाऊ पाहात होतो. परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत