आहे. लोकी नि:स्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी' हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का? हे बघ, मी सांगतो, तसे कर. सुभद्रेकडे धावत-पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली, तर घेऊन ये. तिने न दिली, तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग.'
नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, 'ये रे नारदा! प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात, कोठे काय पाहिलेस, सांग. तुझे आपले बरे. सारीकडे हिंडतोस. तुला नारदा, कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस. अरे, एवढी घाई काय आहे?'
नारद म्हणाले, 'सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. भळभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे.'
'नारदा, आता चिंधी कुठे शोधू?
होतो. कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम! आई, तुझ्या श्यामवर रागावू नकोस. तुझा श्याम आततायी व हट्टी आहे. मनात येईल, ते तो करू बघतो. मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागावलीस? तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो, म्हणून नाही ना रागावलीस? सांग, आई सांग. नाही म्हण.'
माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, 'श्याम मी का रागावेन? मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान,