हा पीतांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मोलवान पैठणी. नारद! चिंधी नाही रे!' असे सुभद्रा म्हणाली.

'बरे तर, मी द्रौपदीताईंकडे जातो.' असे म्हणून नारद निघाले.

द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. 'ये नारदा! हा हार तुझ्याच गळयात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे, म्हणून आलास, नाही रे? याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावयाचे! पण माझा कृष्ण सारा लुटू नका, हो मला ठेवा थोडा.'

'द्रौपदी! थट्टा करावयाला वेळ नाही, बोलावयाला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. एक चिंधी दे आधी.' नारद, घाबर्याच घाबर्याल म्हणाला.

'खरे का, नारदा! कितीसे रे, कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरेरे!' असे म्हणून नेसूचा पीतांबरच फाडून तिने चिंधी दिली.


297 of 468

तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलल्ये, माझेच शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते. परंतु तू पळून गेलास, हे फार वाईट केलेस, असे मनात येऊनसुध्दा वाईट वाटले नाही. श्याम, तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास? परवा गावातला कुणाचासा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास. गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागावू? बाळ, तुझा मला अभिमानच वाटेल. माझा श्याम पळून गेलाच


297 of 773