भरजरि ग पीतांबर दिला फाडून। द्रौपदीस बंधू शोभे नारायण।
माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की, मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो.
गाणे झाले. मला आई म्हणाली, 'श्याम! आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट?'
आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, 'आई! आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितलेस, ते ओळखू?'
'ओळख बरे. तू का मनकवडा आहेस? आईने म्हटले.
मी म्हणालो, 'आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना. तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावयाचे होते होय ना? मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितलेस. खरे, की नाही सांग.'
आई म्हणाली. 'होय. तुला लाजविण्यासाठी नाही; तर तुला प्रेम शिकविण्यासाठी.'
मी एकदम
तर देवासाठी गेला, असे मी अभिमानाने म्हणेन. श्याम! एक लक्षात ठेव, तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव- 'चोरी-चहाडी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस.' देवासाठी पळून गेलास तर जा. सार्याव संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा. अशी मी प्रार्थनाही करीन!'
रात्र सतरावी: स्वावलंबनाची शिकवण
"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं.. अनन्तं वासुकिं शेषं,.. अच्युतं केशवं