उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले, 'दादा! आजपासून मी तुला 'नाही' म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन. भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर.'
दादा म्हणाला, 'श्याम! हे काय रे? क्षमा नि बिमा कसची मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग. तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे, हेही मला माहीत आहे, आई! आम्ही कधी एकमेकांस अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो, तरी फिरून एकमेकांस मिठी मारू.'
आई म्हणाली, 'तुम्ही परस्पर प्रेम करा. त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद.'
रात्र सत्ताविसावी: उदार पितृहृदय
आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईचे दुधाच्या खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा
विष्णु.., अशी दोन-चार लहान लहान स्तोत्रेच येत होती. 'अनन्तं वासुकिं' हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णुसहस्त्रानाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे. त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती; परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये, याचे मला वाईट वाटे.'
आमच्या शेजारी