एका म्हातारबाईने सांगितले, 'भाऊदा! तिन्हीसांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळरात. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला रहा. कोंबडयाला उठून थंड वेळेस जा.' भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, 'म्हाता-ये ! अग, पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले? मी झपाझप जाईन. दूध काढतात, तो घरी पोचेन.'
भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द 'जाऊ नका' सांगत होता. फळणारी पापे 'चल, राहू नको', म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले.
वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्ह्या होता. पावसाळयात त्याला उतार होत नसे. तो पर्ह्याा खोल दरीतून वहात होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती.
आहे. याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाचा, मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची !'
श्याम म्हणाला, 'या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह आहेत. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे.'
श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, 'आपण का एकमेकांस परके आहोत? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काहीएक