आम्ही भेंडया लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले 'श्याम, अरे श्याम' अशी हाक मारत आली. त्यांतील एकजण मला म्हणाला, 'श्याम! अरे, कोणीतरी तुला शोधीत आहे. आमचा श्याम कोठे आहे, अशी चौकशी करीत आहे.' इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही.
मी विचारले, 'भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो.' वडिलांचा तो कसातरी गबाळयासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणार्याी मुलांत मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते. सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही! मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतरदृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच
मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो, 'भाश्या! पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हांस येते ते आहे माहीत आम्हांला. एवढी ऐट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्याआधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी. येऊ नको आमच्याकडे. मी मारीन नाही तर.'
आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, 'काय रे झाले भास्कर? श्यामने का तुला मारले?'
भास्कर म्हणाला, 'श्यामच्या आई! मी नुसते म्हटले, की आणखी