शंकराच्या देवळात गर्दी होती. रूद्राचा गंभीर आवाज येत होता. रूद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या- त्या ऋषीच्या- डोळयांसमोर सर्व ब्रह्मांड आहे, असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्यांच्या डोळयासमोरून जात आहे, असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या सार्या गरजा त्याच्या डोळयासमोर आलेल्या आहेत. तो विश्वासी जणू एकरूप झालेला आहे, असे वाटते. माझ्या वडिलांना रूद्र येत असे. त्यांची रात्री बाळानंतर पाळी येत असे.
आई मला म्हणाली, 'जा ना रे देवळात. तू पाणी आणावयास नाही का लागत, जा.'
'मला नाही उचलणार ते हंडे. केवढाले हंडे व घागरी!' मी म्हटले,
'अरे, आपली लहान कळशी घेऊन जा. नाही तर तांब्या नेलास, तरी चालेल. विहिरीतून एकेक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा.' आई म्हणाली.
'एवढासा तांब्या ग काय घेऊन
'काय, रे श्याम! इतक्या लवकर लिहून झाले?' भीमाताईने विचारिले.
मी म्हटले, 'हो! ही पाहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे, म्हणून मी सारखा लिहीतच होतो.'
'वा! छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर, म्हणजे भास्कर चिडवणार नाही.' ती म्हणाली.
मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचीत होतो. एका आठवडयात पाठ करून टाकावयाची, असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे, असे मनात मी योजिले. रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो, देवच