मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, 'श्याम, आज आलास वाटते? तू इंग्रजी शिकतोस, म्हणून लाज वाटत होती वाटते?' मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हेत हो, संस्कृत नव्हेत, हो त्यांचे मंत्र मराठीत होते.

'सांब सदाशिव पाऊस दे

शेते भाते पिकू दे

पैशाने पायली विकू दे.'

हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतभाते पिकोत, स्वस्ताई होवो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रूद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणावयास लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मीही मोठमोठयाने 'सांब सदाशिव पाऊस दे' म्हणून लागलो; मीही त्या मुलांत मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो.

सामुदायिक कामात आपणांसही जे करता येईल, ते आपण निरलसपणे केले पाहिजे. त्यात लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे. हत्तीने हत्तीप्रमाणे.


313 of 468



मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरुन हात फिरविला. त्यातील आनंद-तो कसा वर्णन करून सांगता येईल?

जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. 'आई बघ; कशी आहे माझी वही? मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागावलो होतो.' असे प्रेमाने म्हटले.

आई म्हणाली, 'तू उतरून घेतलेस, हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे, म्हणून कितीदा मनात येत होते. परंतु तू आपण होऊन दाखविशील, अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी


313 of 773