'आपण भाग विकत घ्यावे.' परंतु पैसे कोठून आणावयाचे! वर्गातील पुस्तकेही सारी मजजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो; परंतु एकही कोश मजजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थांचे भाग आपणांस पाहिजेतच, असे मला वाटले.
आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बर्याेच नोटा होत्या, त्यातील एक लांबवावी, असे मी ठरविले. दुसर्यां चे पैसे चोरणे हे पाप होते; परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे, असे मला वाटले! माझ्या धाकटया भावास मी श्लोक शिकवीत होतो.
'आस ही तुझी फार लागली दे दयानिधे बुध्दि चांगली'
बुध्दी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवीत होतो; परंतु चोरी करून बसलो होतो! माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक पाच रूपयांची नोट कमी!
'भाऊराव! पाच रूपये कमी भरतात. एक नोट नाही.' ते पाहुणे म्हणाले.
'नीट पाहिल्यात का सार्या खिशांतून? कोणाला दिली तर नाहीत?'
पहिल्या पानावर रामाचे चित्र असले, की झाली खरी रामरक्षा! तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील, हो श्याम! कारण तू स्वत: कष्ट करून, सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस!'
रात्र अठरावी: अळणी भाजी
राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, 'राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो.