माझे श्लोक शिकवणे सारं थांबले, चोराला कोठली झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो.
'आई? तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही, वाटते?' मी विचारले. 'बाळा, इच्छा कोठे आहे? दोन घास कसेतरी बळेच पोटात दवडायाचे. दोन धंदे झाले पाहिजेत ना? पाणीउदक करता आले पाहिजे ना? तुम्ही कधी मोठे व्हाल-इकडे लक्ष आहे सारे.' आई म्हणाली.
'आई! मी खरेच मोठा होईन. पुष्कळ शिकेन. खूप वाचीन!' मी म्हटले.
'शीक, पण चांगला. हो. शिकलेले लोक बिघडतात, म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत, तरी मनाने चांगले राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील; परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते.' आई म्हणाली. ती प्रेमळ, थोर माता किती गोड सांगत होती! माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत, याचे मला आश्चर्य वाटे.
परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील, मला त्या फार आवडतात.'
राम म्हणाला, 'त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी; व्याख्याने म्हणावी, का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते.'
राजा म्हणाला, 'श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो.
"अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच