महंमदाला लोक म्हणत, 'तू देवाचा पैगंबर असशील, तर चमत्कार करून दाखव.' तेव्हा महंमद म्हणाला, 'सार्याम सृष्टीत चमत्कार आहेत. मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वार्यांने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का? असे सांगत शेवटी महंमद म्हणाला, 'माझ्यासारख्या अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का?' मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आईसुध्दा कळकळीनेच मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते. हृदयगाभार्याआतील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी श्रुतिस्मृती होती.


318 of 468

रूपया शुध्द चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुध्द धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो.' राम म्हणाला.

"माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू हसशील.' राजाने विचारले.

"सांग, मी हसणार नाही. कोणाच्या खर्यान भावनांना मी कधी हसत नाही.' राम म्हणाला.

"श्यामच्या या आठवणी प्रसिध्द केल्या तर? मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील; आईबापांस त्या उपयोगी पडतील; श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे. नाही?' राजाने विचारले.


318 of 773