'मोठा नाही झालास, तरी गुणी हो.' थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो! इंग्लंडला टयूडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडेतिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे, की, 'त्या वेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते.' कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यातसुध्दा विंचू आहेत. ते तुम्हांस झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात, तरी ते गुप्त दूत आहेतच. सद्सद्विवेकबुध्दीची टोचणी ती सदैव आहेच आहे.

'घरात तर कोणी आले नाही. चमत्कारच म्हणावयाचा!' वडील म्हणाले.

'श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा यांशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम! अरे श्याम!' बळवंतरावांनी हाक मारली.


319 of 468



"परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य, भडक पाहिजे. 'त्यांना 'लैला-मजनू' च्या गोष्टी पाहिजेत. असे तो म्हणतो, 'राम म्हणाला.

त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली. प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पहात होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. 'आज मला नाही रे हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात?' श्यामने विचारले.

"तू वाचीत होतास, म्हणून नाही बोलाविले. दिवसभर इतर काम


319 of 773