मी गेलो. 'काय? मी विचारले. बळवंतराव म्हणाले, 'श्याम! तुझा कोणी मित्र वगैरे आला होता रे? एक नोट नाहीशी झाली आहे.'

मी म्हटले, 'नाही, बोवा. मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते.'

वडील म्हणाले, 'श्याम! तू तर नाही घेतलीस? घेतली असलीस तर सांग.'

'छे, हो! तो कसा घेईल?' बळवंतराव म्हणाले.

आई हात धुऊन आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपुट लागली. स्वत:च्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचाराले. 'श्याम अगदी खरेच नाही ना घेतलेस पैसे तू? कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपासपोटीसाठी पैसे मागत होतास.'

आई म्हणाली, 'श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला रूसला, तरी कोणाच्या वस्तूस हात लावावयाचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले, तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही.


320 of 468

असते, थोडा वेळ वाचीत होतास तर अडथळा करू नये, असे वाटले.' राजा म्हणाला.

"अरे, मला तरी कोठे फारसे वाचावयास आवडते? विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदु:खे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का?' श्याम म्हणाला.

"श्याम, तू भरपूर वाचले आहेस, म्हणून असे म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावे लागते. शेतकर्यामच्या आनंदाचे कवी वर्णन करतात; परंतु शेतकर्या्स तो उपभोगता येत नाही. कारण त्याला ती दृष्टी नसते.' राजा म्हणाला.


320 of 773