मागे एकदा एक वडी घेतली होतीन त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, 'मी घेतली हो, आई.' श्याम घेणार नाही व घेईल, तर कबूल करील. 'श्याम! तू नाही ना बाळ हात लावलास?'

आईचा माझ्यावर केवढा विश्वास! 'आधी घेणार नाही. घेईल, तर कबूल करील.' तिची माझ्यावर केवढी श्रध्दा! आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे :

'विश्वासाची धन्य जाती'

ज्याच्यावर विश्वास टाकता येतो, त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझ्या असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रध्दामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला.

माझ्या डोळयांतून पाणी येऊ लागले. त्या दुबळया अश्रूंनी पाप-पर्वत पडला. 'श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीस घ्यायचास. मला माहीतच आहे. उगी!' असे आई म्हणाली.

आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाणे


321 of 468


इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरूवात केली:

"मित्रांनो! प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते, ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दांहूनही हे मुके परिणामकारक असते.

कसे जेवावे याचीसुध्दा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगावयाचे, 'आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील, तेव्हा आपणांसही मिळेल.


321 of 773