रडत आईला म्हटले, 'आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, आई!'
माझ्याने बोलवेना. आईला वाईट वाटले. 'माझा मुलगा घेणार नाही!' केवढा तिचा विश्वास! स्वत:च्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला; परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रू राखली. घेणार नाही; परंतु घेईल तर कबूल करील.' तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही; परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला.
'श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. उगी!' आईने माझी समजूत घातली.
बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला एक रूपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला.
'श्याम! तू का रे घेतले होतेस ते पैसे?' आईने विचारले.
'आई ! मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी !' मी म्हटले.
'अरे, पण पहिलीच्या पुस्तकात 'चोरी
हावरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये. पानातील पदार्थांवर टीका करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले, तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसर्यारस वर करून दाखवू नये. कारण दुसर्यांाना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे.' या सांगण्याप्रमाणे वडील स्वत: वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे; परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे, तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोणी