म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचाराच्या डोळयांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवीत आहे.

माझ्या धाकटया भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला दोन तीन गाबडया लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा, असे मी ठरवून आलो होतो; परंतु पैसे कोठून आणावयाचे?

माझे वडील कोर्ट-कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्रय येत होते, तरी कज्जेदलाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट-कचेर्यां शिवाय चैनच पडत नाही. स्वत:चे संपले, तर दुसर्यावचे खटले चालवावयास ते घेतात. 'तुझा खटला मी जिंकून दिला, तर मला इतके पैसे, खटला फसला. तर झालेला खर्च सारा माझा.' असे सांगून खटला चालविण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत.

वडील दापोलीस आले, म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून


326 of 468

दांडगा. जणू आस्वादव्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे, 'काय फाकडो झाली भाजी!' पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही. कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते, म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही.

आई मला म्हणाली, 'तुला नाही का रे आवडली भाजी? खात नाहीस रोजच्यासारखी?'

मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, 'तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील?'

मी म्हटले, 'असे


326 of 773