देऊन जावयाचे. खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरविले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेशचतुर्थीला तीन महिने होते. तेवढयात महिन्यांत या खाऊच्या पैशांचा रूपयाभर जमला असता, गणेशचतुर्थीस धाकटया भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असे मी मनात निश्चित केले.

ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेशचतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ एक रूपया दोन आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील; परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईन.

मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. दोन वार कापड घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला.

तो कोट हातात घेतला, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले


327 of 468

नाही काही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेन, तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता?

वडील म्हणाले, 'अरे, तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते, होय ना ग? उद्या पाटीलवाडीहून आणीन हो. जून मिळाला तर उकडगरेच करा.'

आई म्हणाली, 'आणावा. पुष्कळ दिवसांत फणसाची भाजी केली नाही.' बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व विष्णुसहस्त्रनाम

म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी


327 of 773