होते. नवीन कपडयाला मंगलसूचक कुंकू लावतात; परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले.
मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो, ते म्हणाले, 'पावसापाण्याचा जाऊ नकोस. नदीनाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्ह्याू, सोंडेघरचा पर्हात यांना उतार नसेल; आमचे ऐक.' मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता, तो नदीनाल्यास थोडीच भीक घालणार!
नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते, तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल, या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उडया मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्यासतो दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे?
चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे, असा दंडक होता.
पसारा आटोपून आई जेवावयास बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी! मीठ नाही मुळी तीत. मी जवळच होतो.
आई म्हणाली, 'काय, रे श्याम! भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम सांगावे की नाही रे! अळणी कशी रे भाजी खाल्लीत?'
मी म्हटले, 'भाऊ बोलले नाहीत, म्हणून आम्हीही बोललो नाही!'
आईला वाईट वाटले, 'मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे सार्यांीनी.' ती