आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसा बाहेर आलो, देवाला माहीत! माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदीनाल्यांना प्रेमाना भेटावयास जाणारा तो नाला! तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्याइतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून येऊन जात होतो.

रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड् कडाड् आकाश गरजत होते. विजा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो.

शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. 'आई! मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते.


329 of 468

म्हणाली. तिला रूखरूख लागली. ती पुन्हा म्हणाली, 'तरीच तू खाल्ली नाहीस. नाही तर बचकभर भाजी तूच खायचा. निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा, भाजी हवी पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून?'

आपली मोठी चूक झाली, असे आईला वाटले. जी वस्तू दुसर्यायला करून द्यावयाची, ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो, की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही, असे आईला वाटले. तिला रूखरूख लागली.


329 of 773