आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबर्यात घाबर्याे आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरूष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलिस ठाणे होते. तेथे वर्दी देण्यात आली.


घरात बातमी येताच आकान्त झाला. सार्यां्च्या तोंडचे पाणी पळाले! घरात दिवे लागले होते; परंतु सार्यांतची तोंडे काळवंडली होती. कसचे खाणे नि कसचे पिणे! तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्या वेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारा कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, 'देवा नारायणा! तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे! तुझी मी मुलगी. मला पदरात घे. माझे कुंकू राख. माझे चुडे अभंग ठेव. माझे सौभाग्य-नको, आई आई! त्यावर कुर्हारड नको पडू देऊ! मी काय करू? कोणते


33 of 468

गरीब लोक काय घेणार कस्तूरी? पुण्याला जाऊन काही खपली, तर पाहावयाचे !' त्या श्रीमंत व्यापार्यातस राग आला. तो म्हणाला, 'तुझी सारी कस्तूरी मोज. त्या मातीच्या गार्यातत मिसळून देतो. कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे, उत्तरेस जाऊन सांग.' त्या व्यापार्यााने सारी कस्तूरी खरेदी केली व गार्याात मिसळून दिली. वर्हा डातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो, असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या वेळेस कोणी रे, तिथे कस्तूरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप,


33 of 773