'अण्णा हा लहानसा कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला.

'मग सांगेन. घरात जा घेऊन.' मी म्हटले.

'आई! हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलान्. होय आई!' धाकटा भाऊ आईला विचारू लागला.

आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो.

आई म्हणाली, 'श्याम! हा कोणाचा कोट?'

'मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठवला असेल!' वडील म्हणाले.

'नाही. हा मी पुरूषोत्तमसाठी शिवून आणला आहे.' मी म्हटले.

'पैसे, रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस? का फीचे दवडलेस?' वडिलांनी विचारले.

'कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलास?' आईने कातर स्वरात विचारले.

'आई! त्या दिवशी तू सांगितले होतेस 'हा पहिला व शेवटचा हात लावलेला.' ते मी विसरेन का? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत.' मी म्हटले.


331 of 468

दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती, संयम व समाधान यांवर उभारलेली आहे; त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते.


रात्र एकोणिसावी: पुनर्जन्म


"माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथे शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी दोन-तीन वेळा पळून गेलो. नाना खोटया चहाडया मी तेथे केल्या. शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा.


331 of 773