'मग उधार का शिवून आणलास, श्याम?' वडिलांनी विचारले.

'भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा, दोन आणे देत असा; ते मी जमविले. गेल्या दोन-महिन्यांचे सारे जमविले. त्यांतून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, 'तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट'. मी मनात ठरविले होते, की गणपतीला नवीन कोट आणावयाचा. पुरूषोत्तम, बघ तुला होतो का?' मी म्हटले.

'अण्णा ! हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा! आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई, बघ!' पुरूषोत्तम, आईला दाखवू लागला.

मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली, 'श्याम! तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस; परंतु मनाने मोठा आजच झालास, हो. हेच प्रेम, बाळांनो, पुढेही ठेवा. या प्रेमावर, देवा, दृष्ट नको कुणाची पाडू!'

वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरविला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते. सार्याव स्मृती होत्या.


332 of 468

उगीच स्वत:च्या व दुसर्याोच्याही गळयाला एखादे वेळेस फास लावावयाचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले.

त्या वेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. त्यांची प्रकृती फार अशक्त होती. म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली; परंतु फार आजारी पडली. आईवर सारा


332 of 773