'आई, याला कुंकू लावू?' पुरूषोत्तमाने विचारले.
'बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून, देवांना नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणावयास जा, हो.' आई म्हणाली.
रात्र एकतिसावी: लाडघरचे तामस्तीर्थ
राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळया आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही; तर चांगल्या गोष्टींचेही असतात.
'श्याम! आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस, त्या असतात साध्या; परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले; तसे तुझ्या या लहान गोष्टींत धर्माचे व संस्कृतीचे विशाल
कामाचा बोजा होता. घरात दुसरे बाईमाणूस त्या वेळेस नव्हते. बहीण फार आजारी होती. अशा स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले. माझ्याकडे कोणीच लक्ष देईना, मी सर्वांचा नावडता झालो होतो. माझ्या अक्कावर सार्यांयचा लोभ, सर्वांचे प्रेम होते. तिची अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्या वेळेस फार हाल होत. कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे. अक्काला विषमज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणे धोका होता. कारण ते दूध विषारी झालेले. यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे.