दर्शन होते. श्याम! काल मी रामजवळ म्हटले, की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टीरूपाने तू धर्म सांगत आहेस; धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणांस ओतता येईल, हे तू दाखवीत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीणभावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृध्द, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम! तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले! त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास. त्या वेळेस मला गहिवरून आले होते. श्याम! आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही?'

'राजा! अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे; तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून


334 of 468



एके दिवशी अक्काला वात आला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते. परंतु मनात साठविलेले ते सारे दु:ख ती वातात बोलत होती. तिला शुध्द नव्हती. त्या बेशुध्द स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्चून लग्न केले, तरी सासरी जाच का असावा, असे तिला वाटे.

ज्याप्रमाणे भाऊबंदकी, त्याप्रमाणे सासुरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसर्या घरातील आलेली मुलगी, तिचे आईबाप व्हावयाचे, हे खरे म्हटले तर सासूसासर्यां चे कर्तव्य. परंतु त्यांना वाटते,


334 of 773