दिसते. मी कीर्तन करतो, तेव्हा संगीतगायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने व कळकळीने भरून काढतो. राजा! मजजवळ दुसरे काय आहे? काही नाही. खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता. मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्दवेल्हाळ मी; परंतु तुम्ही कार्यवेल्हाळ आहात. राजा! मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिमा, नामदेव, राम हे किती काम करतात! तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी मजजवळ काही नाही, हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात.' श्याम बोलत होता.
इतक्यात राम आला.
'काय, रे राम? गाडी आली की काय? श्यामने विचारले.
'नाही. बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा! रात्री जा, काही उशीर होणार नाही!' राम म्हणाला.
'देवाची इच्छा!' राजा म्हणाला.
सायंकाळ झाली होती.
की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील, तो सुदिन. सासुरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात. त्यांत पाहा सासुरवासाचे कसे वर्णन केलेले आहे.
सासरचे बोल जसे कारल्याचे वेल । गोड कसे लागतील काही केल्या।
सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी। रात्रंदिन रडविती धायी धायी।
वगैरे ओव्यांत हे करूण चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या स्थितीचे हे हीनदीन वर्णन केलेले आहे. कार्ल्याचे कडू वेल, रेशमाच्या गाठी- या उपमा बायकांनाच