आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते, लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदीतीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातांत घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते.
'श्याम! चला परत जाऊ.' राजा म्हणाला.
'राजा! असे भव्य सृष्टिदर्शन झाले, म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा.' श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती.
शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एकेक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एकेक माणूस जमता जमता सारी
सुचतील. अजून साधी आपुलकीही मनुष्याला शिकावयाची आहे. सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली, म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे. आम्हांलाही मारीत असत, म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुले-मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासुसुनेचा खेळ करीत असतील, तर त्यात