जणू सृष्टिमंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या! फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टिमंदिरात काकडआरती सुरू झाली होती.

गाडीमध्ये मी व माझी आई दोघे जणच होतो. मी व माझी आई; माझी आई आणि मी. दोघे, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय चौदा-पंधरा वर्षाचे होते; तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली, असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती.

'किती रे भरभरीत शेंडी? श्याम? तेलबील नाही वाटते लावीत कधी?' आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो.

सुखावले मन । प्रेमे पाझरती लोचन

अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी, आम्ही


339 of 468



दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसलो होतो. ताम्हनात थंड पाणी घालून ते ताम्हन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या? कोठले कोलन वॉटर? आई ताम्हन धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या काय मनात एकदम आले, कोणास माहीत. परंतु ताम्हन मला धरावयास सांगून ती उठली. आई उठली, ती देवाजवळ गेली. देवघरात जाऊन ती देवास म्हणाली, 'देवा, शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दहीभाताने


339 of 773