एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे, आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी होय. आम्हां दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही; तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन, वगैरे मनोरथ मी मनात मांडीत होतो. मनोरथाचे मनोरे रचावयाचे व पाडावयाचे, हा मनाचा चंचल स्वभावच आहे.

आई मला म्हणाली, 'श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली?'

'आई तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई, मला थोपट. आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे, असेच मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण.' माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती.


340 of 468

लिंपीन, पोरीला गुण येऊ दे. उतार पडू दे. अंगाची तलखी कमी होऊ दे. ताप उतरू दे.' प्रयत्न चालले होते. प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती. आईचा देवावर भरवसा होता; परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती. आपल्या प्रयत्नांत आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे.

"रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा. येथे रडवू नकोस.' असे आई मला म्हणाली. मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात


340 of 773