दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धो धो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती; परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहात होतो. झोप येत नव्हती. तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ; परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वत:ही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. या वेळेसही तोच अनुभव आला.
घनदाट या रानात । धो धो स्वच्छ वाहे पाणी
माझ्या श्यामच्या जीवनी । देव राहो ॥
आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणार्या् पाण्याला पाहावयास मी उठून बसलो.
आलो. तिन्हीसांजची वेळ होत आली होती. बाहेर कांडपिणींना कांडप घातलेले होते, ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावयाचे होते. गुरे गोठयात येण्याची वेळ होती. गुराखी 'गुरे आली हो' एवढे ओरडून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईचा प्रेमाने थबथबलेला हात अंगाला लागावा, म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे, म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर! लहान, दुबळा जीव! तिची