आईने विचारले, 'काय, रे उठलाससा? कंटाळलास, वाटते? नीज, हो. माझी मांडी दुखायची नाही.'

मी म्हटले, 'आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का?'

दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा, की तिथे हा आनंद तुम्हांला भेटेल.

दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैलरहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कुऊ कुऊ आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहात होते. पोफळी, नारळी,


342 of 468

आई अंथरूणात तळमळत होती, वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवसांत होत नव्हते. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता? आक्रोश करीत होता? 'माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा.

मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हपापलेली नाही, तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल.' असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्शी रडू लागली, टाहो फोडू लागली. कळवळली.


342 of 773