भेटत आहोत!' अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. 'आणि हा कोण?' तिने माझ्याकडे पाहून विचारले.
आई म्हणाली, 'सुभ्ये! हा श्याम हो. लहानपणी हट्ट करणारा. सर्वांशी भांडणारा तो हो हा. तुला नाही का आठवत?'
'बराच की रे मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते?' सुभाताईने विचारले.
'हो, मी चौथ्या इयत्तेत आहे.' असे मी उत्तर दिले.
त्या प्रेमळ, भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, 'वयनी, समुद्रावर आताच स्नाने करावयास जा; म्हणजे दहा-अकरा वाजायला परत याल. दुपारी जेवणे-खाणे झाल्यावर देवीला जाऊ; म्हणजे सायंकाळी तुम्हांला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढी आल्यासारखी आठ दिवस राहतीस, तर किती चांगले झाले असते! मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का?'
'सुभ्ये! ही गाडी परत
माझी आई संतापली. रागावलीही. तिच्या क्षमेला सोशिकपणालाही काही सीमा होती. मर्यादा होती. 'कोठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला! इकडची काडी तिकडे करायला नको! तिकडे लावलेन् दिवे, आता येथे आला आईशिला छळायला. जरा पोरीला खेळव म्हटलं, तर फुगला नुसता एरंड. तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेडयाला, रिंडोजी नुसता. श्याम्या, अरे काटर्या! उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर. श्वास धरलंन् वाटते. तू मरत नाहीस. तू मात्र छळायला उरला आहेस.' आई रागावून दु:खसंतापाने वेडी होऊन बोलत होती.