भाडयाची ठरविली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आल्ये आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो.' आई म्हणाली.
आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोराने निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस्तीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळयांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो! अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र.
आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हास दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. 'येथेच लाल पाणी का बरे?' असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला.
आईचे शब्द मी ऐकत होतो. परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणार्याऐ रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेर्याल घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली.
आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे, हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवाहवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन