'श्याम, श्लोक म्हण चांगलासा.' आई म्हणाली.

मी 'केयूरा न विभूषयन्ति पुरुष.' हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला.

'इंग्रजी शाळेत जातोस, तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते? अलीकडच्या मुलांना चार श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे, श्याम?' त्यांनी मला विचारले.

'दुसरा.' मी सांगितले.

'वा! चांगला हुशार दिसतोस!' ते म्हणाले.

सुभाताईचा मुलगा पाच वर्षांचा होता व मुलगी दोन-अडीच वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखविला.

'श्याम! खांडवी घे हो आणखी. लाजू-बिजू नकोस.' सुभाताई म्हणाली.

'श्याम मुळी सार्याा जगाचा भिडस्त. येथे नको हो लाजायला! श्याम!' आई हसत म्हणाली. माझी आईही जेवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली, 'वयनी! तू आपली सावकाश जेव. त्यांना जाऊ दे उठून.'

सार्यांउची जेवणे झाली.


348 of 468



"तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते? स्वत:ला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले, असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल?' भिकाने विचारले.

"शिवाय लोकांची श्रध्दा असते, तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात. 'गोविंदा म्हणाला.

"हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा.' राम म्हणाला."इकडेच बरे आहे. असा येथे बसतो.' ते म्हातारबाबा म्हणाले.


348 of 773