तिच्या पायांवर वाहिल्या. खणनारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. सार्यांानी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोर्या त आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते, मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने, तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो.

देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हांला आता परत दापोलीस जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला.

'तू दापोलीस जवळच आहेस; एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे, तर येथे येत जा. ऐकलेस ना, श्याम!' सुभाताई म्हणाली.

तिचे यजमान म्हणाले, 'श्याम! येत जा, रे. आम्ही काही परकी नाही. अरे गेल्या-आल्याशिवाय


351 of 468

मोठया प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठयांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते; परंतु या महापुरूषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव. हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्रयांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती; परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे


351 of 773