ओळख तरी कशी होणार. ये हो!' मी 'हूं' म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली. पपनसेही दोन घेतली.

'सुभ्ये, येते हो!' आई म्हणाली आई निरोप मागू लागली.

'वयनी! आता पुन्हा, ग, केव्हा भेटशील?' सुभाताई भरल्या मनाने म्हणाली.

आई म्हणाली, 'सुभ्ये! देवाला माहीत, केव्हा भेटू, ते. बारा वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडल्ये. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे दोन भाऊ पुण्या-मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेल्ये तर! परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी? सुभ्ये, गेली पाच वर्षे सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला, की पडावे अंथरूणावर; घाम येऊन ताप निघाला, की उठावे कामाला, घरात तरी दुसरे कोण आहे? गरिबाला दुखणी येऊ नयेत हो. पापच ते. जिभेला


352 of 468

नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे सांगणारे 'केसरी' संपादक, गीतारहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुध्द बंड उभारणारे, तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलीक व गणित विशारद रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील.

दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे.


352 of 773