चव मुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कसे तरी दोन घास घशाखाली ढकलायचे. असो. देवाची इच्छा! आपण माणसे तरी काय करणार दुसरे आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा. हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दु:ख उगाळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस; तुझा प्रेमळ स्वभाव, म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू. चंद्री नि तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू, म्हणून बोलत्ये. जरा दु:ख हलके होते. बरे वाटते. जगात आपल्या दु:खाने दुसरा दु:खी होतो, हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे' असे म्हणता म्हणता आईच्या डोळयांना पाणी आले व सुभाताईनेही डोळयांना पदर लावला.
'वयनी! आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वयनी! श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही हो ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी!' सुभाताई म्हणाली.
त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत; उन्हाळयात लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंडयाझुंबरासारखे डोलत असतात! दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टिसौंदर्यांची माहेरघरे आहेत.
दापोलीची इंग्रजी शाळा त्या वेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एके वेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले.
दापोलीहून