आई म्हणाली, 'हो. तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला, की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे, येत्ये हो!' असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात एकेक रूपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला.

'वयनी! रूपया कशाला?' सुभाताई म्हणाली.

'राहू दे, ग! मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुभ्ये, तुझी वयनी आता श्रीमंत नाही, हो. असू दे हो तो रूपया.' असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली.

आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली.

सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामस्तीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तास जात होता. त्याच्याकडे डोळे


354 of 468

माझा गाव सहा-साडेसहा कोस होता. पायाचे मी एवढे चालून जाईन की नाही, याचा मला आत्मविश्वास नव्हता; परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार-रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की, मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाला व सोमवारी पहाटेस उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा.

एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा


354 of 773