'आई, तू मला हवीस, आम्हांला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस, तर कोणासाठी शिकावयाचे, कोणासाठी जगावयाचे? आई! तुला देव नाही हो नेणार!' असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेविले. जणू त्या वेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवीत होतो.
'देव करतो ते सारे बर्याीसाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले.' आई म्हणाली.
आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेविले होते. मी थोडया वेळाने पुन्हा आईला म्हटले, 'आई! तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकार्या चा मुलगा आपल्या झोळीतील चार दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई, आई! आपलेही तसेच सारे चांगले होईल. नाही का? आपले दारिद्रय जाईल, चांगले दिवस येतील.'
'श्याम! देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस
त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो लोकमान्य टिळक म्हणत असत, 'मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो. दोन महिने तेथील शुध्द व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते!' माझीही जणू तशीच स्थिती होती. दर आठ दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहावयाचे व घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की,