करतो. विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारीची माणसे. आपली कोठे तेवढी लायकी आहे? आई म्हणाली.
'आई ! देवाची कृपा नेहमीच असते. होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच, असे म्हणतात, ते खरे का ग?' मी प्रश्न विचारला.
'बाळ! तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे, देव जे जे करतो ते बर्याेसाठी, एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले, ते तुझ्या बर्याससाठी ना? मग माझ्याहून, किती तरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रध्दा असावी.' आई जणू श्रध्दोपनिषदच गाऊन राहिली होती.
एकदम माझे लक्ष समोर गेले. 'वाघ! आई! वाघ!' मी घाबर्यास घाबर्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा! काय ती ऐट! उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या
प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बाळपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो, तेच देतो.
मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळयांतून अश्रू येत होते, या, साडेसहा कोसांच्या रस्त्यावर वाटेत किती तरी खेडी आहेत. एके