जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो. तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करूणा पटवून द्यावयाला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत. गाईगुरे, मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी, माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता.

हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री नऊ वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही. दुसर्याे दिवशी गेली.

मित्रांनो! तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधीही मी व आई एकत्र कोठे गेलो नाही. तो एकच दिवस! त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टिमाऊलीच्या- समुद्र व वनराजी यांच्या सहवासात


359 of 468

ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते, असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीघ तर नाही येणार! मी त्या वेळेस बारातेरा वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली, म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोडविहीर होती. म्हणजे घोडयांना आत उतरून जाता येईल.


359 of 773