होतो. दोघे रंगलो. प्रेमात डुंबलो. हृदये हृदयांत ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने, अस्सल शंभर नंबरी सोने करू पाहात होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला.
गडयांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती.
असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोडया वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंत:करणाने गेली.
रात्र बत्तिसावी: कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे; परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते; भिकेस लावते.
अशा मोठमोठया पायर्याि त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच! मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल, म्हणून झपझप पावले टाकीत चाललो.
शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली, तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल, त्याच्या कपाळाला लावावयाची!