कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा. दीनपणा.

सावकाराचा माणूस! वडील त्याची बडदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेविली. 'कढी कर व कढीत कढीलिंब टाक, म्हणजे वास लागेल.' अशी आईला सूचना देऊन वडील शेजावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती; तरी शेजारून आई घेऊन आली. चहापानानंतर आईने कढत पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली; परंतु स्वत:चे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर! श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकर्याचला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकर्यााने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकर्याचवर खटला भरला व त्या शेतकर्याास २५ रुपये दंड झाला,


361 of 468



मी अंगणात दिसताच 'अण्णा आला, अण्णा आला,' असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो.

आई म्हणाली, 'उशिरा का निघालास? जरा लौकर निघावे, की नाही? बाहेर रात्र झाली.'

मी म्हणालो, 'माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे होते.'

'मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रातीस यावयाचे.' आई म्हणाली.

'आई! मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस, की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन.' असे म्हणून मी आईला


361 of 773