'उठा वामनराव, हातपाय धुवा' असे वडील त्यांना म्हणाले.
'या, बसा येथे सोवळे नसले तरी चालेल. काही हरकत नाही.' असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हांस सोवळया-ओवळयासाठी बोलावयाचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वत:च्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदोउदो करणे, एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्त्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्नमुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने; पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने; ह्या खोटया कुलाभिमानामुळे, आंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे; भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्टकचेर्यािमुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे; कर्ज उरावर बसत होते, तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे! गडयांनो! तुमच्या बायकामाणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाटयावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे
'तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? ऊठ. संध्या वगैरे करायची.' ते रागाने बोलले.
आई म्हणाली, 'आताच तो आला. दमला आहे अगदी. गळून गेल्यासारखे वाटते, म्हणाला. जरा बसला आहे. श्याम! जा, संध्या वगैरे कर.'
मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळयांतील पाण्याची देवाला शतअर्ध्ये सुटत होती.
वडील पुन्हा म्हणाले, 'तिकडे संध्या वगैरे करतोस, की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे? हजाम मिळत नाही, वाटते? नुसता कावळा