निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल. अंधारातून उजेड येईल, असे मानणे म्हणजेच आस्तिक्यभाव.' राम म्हणाला.

'परंतु निशा संपून आलेल्या उषेची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे, ते मला समजत नाही. जाऊ दे. फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल, ते करावे. दगड उचलावा; काटा फेकावा! फुलझाड लावावे; रस्ता झावा; कोणाजवळ गोड बोलावे; गोड हसावे; आजार्यााजवळ बसावे; रडणार्या चे अश्रू पुसावे. दोन दिवस जगात राहणे! माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार!'

'अरे, आपण संघटना करू. नवविचार फैलावू; दैन्य हरू; भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे.' राम म्हणाला.

प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थनामंदिरात सारी मंडळी


373 of 468

सत्य, हित व मंगल यांसाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे, सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जिवास धर्माची हवा, कोठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो, ते मी सुंदर दिसावे, म्हणून ! खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे.

त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो; परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम दई. परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते.


373 of 773