मास्तर म्हणतात, 'अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली.' आई! आपण एकदा श्रीमंत होतो, ते लोकांना माहीत आहे; परंतु आज घरी खायला नाही त्यांना माहीत नाही; सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो.'
'श्याम! तू आता शाळा सोडून दिली पाहिजे.' आई शांतपणे म्हणाली.
'आई! आताशी तर पाचवी इयत्ता माझी पास झाली. एवढयात शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमवता येणार आहे?' असे मी आईला विचारले.
'तुला कोठेतरी रेल्वेत लावून देऊ, असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठे नोकरी, मिळाली, तर.' आई म्हणाली.
'आई! एव्हापासूनच का नोकरी करायवयास लागू? या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ? आई! माझ्या केवढाल्या उडया, केवढाले
तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात.' माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले.
आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तंवसे आणले होते. तंवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तंवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. चार चार महिने टिकतात. पावसाळयातील भोपळे व तंवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले, म्हणजे ती टिकणार नाहीत, अशी समजूत असते.
वडील आईला म्हणाले, 'हे तंवसे आणले आहे. पातोळे कर. श्यामला आवडतात.